Ad will apear here
Next
‘सामाजिक दायित्वाकडे पाहण्याचा कॉर्पोरेट क्षेत्राचा दृष्टीकोन बदलतोय’
डॉ. नौशाद फोर्ब्ज यांचे प्रतिपादन
पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने धोरण पत्रिकेचे प्रकाशन करताना डॉ. नौशाद फोर्ब्ज यांच्यासह हितेंद्र सिंग, जे. श्रीधर, प्रदीप भार्गवा, मधुकर कोतवाल, विनायक केळकर, राजेंद्र एरंडे आदी.

पुणे : ‘सामाजिक दायित्व अर्थात सीएसआर याकडे बघण्याचा उद्योग विश्वाचा दृष्टीकोन गेल्या पाच वर्षांत सकारात्मकरित्या बदलत आहे. ही स्वागतार्ह बाब असून, नजीकच्या भविष्यात उद्योग विश्वातील कंपन्यांनी एकत्रित येत सीएसआरच्या माध्यमातून योजनाबद्ध विकास करण्याची गरज आहे,’ असे मत फोर्ब्ज मार्शलचे सहअध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्ज यांनी व्यक्त केले. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डॉ. फोर्ब्ज यांच्या हस्ते ‘गव्हर्नन्स अॅँड इफेक्टिव्हनेस ऑफ एनजीओज- द वे अहेड’ या धोरण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अॅँड अॅग्रीकल्चर अर्थात एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गवा हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘गव्हर्नन्स अॅँड इफेक्टिव्हनेस ऑफ एनजीओज- द वे अहेड’ या धोरणपत्रिकेचे लेखक व ‘एल अॅँड टी’च्या संचालक मंडळाचे माजी सदस्य मधुकर कोतवाल, धोरण पत्रिकेचे सहलेखक व अलाईड डिजिटल सर्व्हिसेस लि.चे कॉर्पोरेट सल्लागार राजेंद्र एरंडे, बजाज ऑटो लि.चे सचिव व कम्प्लायन्स अधिकारी जे. श्रीधर, प्राज इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट सस्टेनॅबिलिटीचे प्रमुख विनायक केळकर आदी या वेळी उपस्थित होते.

नौशाद फोर्ब्जया वेळी बोलताना नौशाद फोर्ब्ज म्हणाले, ‘ गेल्या पाच वर्षांत सीएसआरकडे कंपन्या सकारात्मतेने पहात आहेत. इतकेच नाही तर याद्वारे काहीतरी बदल व्हावा यासाठीदेखील त्या प्रयत्नशील आहेत. हेच लक्षात घेत आपले शहर, आपला देश यांच्या गरजा ओळखत पुढील पाच वर्षात उद्योग विश्वातील कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून एकत्रितपणे योजनाबद्ध विकास करावा असे मला वाटते.’

‘याबरोबरच स्वयंसेवी संस्थांनी काम करताना अपेक्षित असलेली सुनियोजीतता व प्रभावीपणा या विषयीचे जे निकष या धोरण पत्रिकेत सांगण्यात आले आहेत. त्याचा फायदा स्वयंसेवी संस्थांना नक्की होईल,’ असेही ते म्हणाले.

‘भारतामध्ये सुमारे ३० लाखांहून अधिक स्वयंसेवी संस्था असून, कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने सुनियोजीतपणे व प्रभावीपणे कसे काम करावे याविषयीचे काही सूचना या धोरणपत्रिकेत दिल्या आहेत,’ असे प्रदीप भार्गवा यांनी नमूद केले. हितेंद्र सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZQDCA
Similar Posts
मॉरिशसमधील व्यवसाय संधींबाबत परिषदेचे आयोजन पुणे : भारतातील तरुण व्यवसायिकांना मॉरिशसमध्ये व्यवसायाच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. त्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत ३२३४ डी दोन आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी, २८ जानेवारी २०१९ रोजी एका उद्योग परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
शीतगृह व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज पुणे : ‘देशातील शीतगृह व्यवस्थेचे जाळे अधिक मजबूत आणि व्यावसायिक दृष्टीने अधिक सक्षम केल्यास भारतातील खाद्य प्रक्रिया क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडेल, असे मत महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध विभागाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी मंगळवारी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने आयोजित
मराठा चेंबरतर्फे ‘यूथ फेलोशिप’ची घोषणा पुणे : ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’ अर्थात, ‘एमसीसीआयए’ने ‘यूथ फेलोशिप’ कार्यक्रमाची घोषणा केली आहे. याद्वारे पदवीधर व पदव्युत्तर पदवीधारक युवकांना एक वर्ष मराठा चेंबरसोबत फेलो किंवा स्कॉलर म्हणून काम करता येणार आहे.
‘आर्थिक विकासासाठी औद्योगिक प्रगती महत्त्वाची’ पुणे : ‘औद्योगिक प्रगती ही आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, मागील ६५ वर्षांत आपण उद्योगांची कार्यक्षमता वाढविली असती, तर ५.५ ट्रिलियन डॉलरचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) गाठणे शक्य झाले असते,’ असे मत डल्लास येथील टेक्सास विद्यापीठातील टेक्नॉलॉजी स्ट्रॅटेजी विभागाचे प्रा. सुमित मजुमदार यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language